नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यानुसार येत्या 8 फेब्रुवारीला मतदान तर 11 तारखेला निकाल लागणार आहे. यासोबतच दिल्लीत आजपासून आचार संहिता लागू झाली आहे. एकाच टप्पात निवडणूक होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
२२ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेची मुदत संपणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुकीत १३७५० पोलिंग बूथवर जवळपास १.४६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना १४ जानेवारी प्रसिद्ध होणार आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला 70 पैकी 67 जागांवर विजय मिळाला होता तर भाजपने 3 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला त्यावेळेस खातेही उघडता आले नव्हते.