विधानसभा निवडणुकीची घोषणा; आचारसंहिता लागू

election

मुंबई प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली असून राज्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

 

महाजनादेश यात्रेच्या समाप्तीनंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज दुपारी राज्य निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणूक प्रक्रियेची घोषणा करण्यात आली. यासोबत राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

 

राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला यानुसार राज्यात…ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. पूर्ण निवडणूक कार्यक्रम हा पुढीलप्रमाणे आहे.

* अर्ज भरण्याचा कालवधी : २७ सप्टेंबर ते ४ अॉक्टोंबर

* माघारीची मुदत : ७ अॉक्टोंबर

* मतदानाची तारीख : २१ अॉक्टोंबर

* निकाल : २४ अॉक्टोंबर

राज्य विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच आघाडी जाहीर केलेली असली तरी युतीचे गाडे जागा वाटपांवरून अडून पडले आहे. वंचित बहुजन आघाडीतून एमआयएम पक्ष बाहेर पडला असला तरी शेवटच्या टप्प्यात त्यांची आघाडीदेखील होऊ शकते. मनसेने अद्याप पत्ते उघडलेले नाहीत. तर अन्य लहान पक्षांनीदेखील अद्याप पूर्णपणे आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तथापि, आता निवडुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content