जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील असोदा- सार्वजनिक विद्यालयात आज सकाळी अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथीनिमित्त दोघं महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेचे अध्यक्ष विलासदादा चौधरी व सचिव कमलाकर सावदेकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या खाचणे, केंद्रप्रमुख वाघे सर,उपशिक्षक एस.एस.जंगले उपस्थित होते. 6वी अ च्या फाल्गुनी कोल्हे, मिताली चौधरी, दिक्षा चौधरी, गायत्री कोळी,आदिती कोल्हे या विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळकांचा पोवाडा सादर केला. मैथिली चौधरी,कृष्णा गुरव, चेतन चौधरी, तेजश्री कोळी,निशा पाटील, इलियाज पिंजारी, लोकेश कोळी, पूनम चौधरी,रुचिता सूर्यवंशी, धनश्री शिंपी या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्याविषयी भाषणे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री बाविस्कर या विद्यार्थिनीने केले. तर आभार पी. जे. बह्राटे यांनी मानले. विद्यार्थ्यांना भावना महाजन, पूजा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.