Home Cities अमळनेर अमळनेरचे आमदार अनिल पाटीलही राष्ट्रवादीसोबतच- मलिकांची घोषणा

अमळनेरचे आमदार अनिल पाटीलही राष्ट्रवादीसोबतच- मलिकांची घोषणा

0
65

anil bhaidas patil

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे ४९ आमदार पक्षासोबत असून अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील हेदेखील परतणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी जाहीर केले आहे.

काल सकाळी अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असणार्‍या आमदारांपैकी बहुतांश पक्षाकडे परतले आहेत. काल रात्री प्रवक्ते नवाब मलीक यांनी पाच आमदार वगळता सर्व पक्षांसोबत असल्याचे जाहीर केले होते. यानंतर आज सकाळी अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील हेदेखील पक्षासोबत राहणार असल्याचे नवाब मलीक यांनी जाहीर केले आहे. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आहे.

खाली पहा : नवाब मलीक यांनी केलेले ट्विट.

खाली पहा : अनिल भाईदास पाटील यांनी फेसबुकवरून मांडलेली भूमिका.


Protected Content

Play sound