धरणगाव उपनगराध्यक्षपदी अंजली विसावे यांची बिनविरोध निवड

धरणगाव (प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष वासुदेव चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानुसार आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत शिवसेना नगरसेविका अंजली विसावे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, पी.एम.पाटील, उषाताई वाघ, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, विजय महाजन, गटनेते पप्पू भावे, कैलास माळी,चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

जिल्हाधीकारींच्या आदेशानुसार पीठासीन अधिकारी तहसीलदार कुलथे व मुख्यधिकारी सपना वसावा याचा उपस्थितीत उपनगराध्यक्ष पदाची निवड पार पडली. आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत अंजली विसावे याचा एकमेव अर्ज असल्याने त्याना बिनविरोध उपनगराध्यक्ष घोषित करण्यात आले. यानंतर पालिका सभागृहात सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, पी.एम.पाटील, उषाताई वाघ, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, विजय महाजन, गटनेते पप्पू भावे, कैलास माळी,चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, जि.प माजी उपाध्यक्ष जाणकीराम पाटील, चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग सातपुते, प. स. सभापती अनिल पाटील, माजी सभापती दिपक सोनवणे, प्रेमराज पाटील, आसाराम कोळी सर्व सन्माननिय नगरसेवक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सहकार मंत्रीगुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ, कैलास माळी, पी एम पाटील यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्यात. अंजली विसावे हे चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे याची धर्मपत्नी आहे. सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले. तर आभार नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अंजली विसावे यांनी मानले

Add Comment

Protected Content