सही समय पर सटीक झटका दूंगी : अंजली दमानिया

रावेर (प्रतिनिधी) रावेर लोकसभा निवडणुकीत “सही समय पर सटीक झटका दूंगी’, असे म्हणत सर्वांना ‘वेट अॅण्ड वॉच’वर ठेवत सामाजिक कार्यकत्या अंजली दमानिया रावेर न्यायालयातून निघुन गेल्या. त्यांच्या या इशाऱ्याला निवडणूकीपूर्वी महत्वप्राप्त झाले आहे. दरम्यान,खडसे बदनामी प्रकरणी दमानिया यांना आज रावेर न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बदनामी प्रकरणी तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी श्रीमती दमानिया यांच्या विरुध्द रावेर न्यायालयात बदमानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणात जामीन देण्यासाठी दमानिया न्यायालयात हजर झाल्या होत्या. यावेळी त्यांच्यातर्फे अॅड. जे. जी. पाटील, सुनील कुलकर्णी,यांनी काम पाहिले तर फिर्यादी भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांच्यातर्फे अॅड. तुषार महाजन यांनी काम बघितले. दरम्यान, अंजली दमानिया यांच्यातर्फे अॅड. सुधिर कुलकर्णी यांनी कायम स्वरुपी गैरहजर प्रकरणी कलम २०५ प्रमाणे अर्ज दाखल केला होता. त्यावर फिर्यादी पक्षाचे वकील सी. जी. पाटील यांनी युक्तीवाद करण्याबाबत सांगून देखील गैरहजर राहिले, म्हणुन अॅड.सुधीर कुलकर्णी यांनी जोरदार अपक्षेप घेतला.यावर अंजली दमानियांना प्रवास खर्च म्हणून एक हजार रुपये देण्याचे आदेश न्यायमूर्ती आर एल राठोर यांनी दिले. तर पुढील तारीख अकरा मार्च देण्यात आलेली आहे.

 

Add Comment

Protected Content