Home Cities भुसावळ अनिल चौधरींच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट

अनिल चौधरींच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट

0
30

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले असून यावरून युजर्सला पैशांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्यानंतर दोनच दिवसांनी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट उघडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: अनिल चौधरी यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

यात त्यांनी म्हटले आहे की, कुणी तरी माझ्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले असून यावरून पैशांची मागणी केली जात आहे. या अकाऊंटला कुणी प्रतिसाद देऊ नये. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याचे अनिल चौधरी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

बनावट फेसबुक अकाऊंटबाबत अनिल चौधरी यांनी जारी केलेली पोस्ट आपण खाली पाहू शकतात.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=907571739994605&id=100022253632679


Protected Content

Play sound