पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान अशासकीय प्रशासकीय मंडळातील प्रशासक / सदस्य अनिल महाजन यांना मुख्य प्रशासकपदी नेमणूक करणेबाबत महाराष्ट्र शासनाचे पणन विभाग, मंत्रालय अव्वर सचिव प्रमोद वळंज यांनी पणन संचालक, पुणे यांना आवश्यक ते कारवाईसाठी आदेश दिले आहेत.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाच्या निवडीबाबत पणन विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय अव्वर सचिवांचे पणन संचालक, पुणे यांना तसेच पणन संचालक, पुणे यांनी उपनिबंधक जळगाव यांना निर्देश दिले आहेत.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान अशासकीय प्रशासक मंडळाच्या बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील प्रशासकीय मंडळातील चार सदस्य कायम ठेवण्यासाठी व मुख्य प्रशासकपदी अनिल महाजन यांच्या निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान अशासकीय प्रशासकीय मंडळातील प्रशासक / सदस्य अनिल महाजन यांना मुख्य प्रशासक पदी नेमणूक करणेबाबत महाराष्ट्र शासनाचे पणन विभाग, मंत्रालय अव्वर सचिव प्रमोद वळंज यांनी पणन संचालक, पुणे यांना आवश्यक ते कारवाईसाठी आदेश दिले आहेत. पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण अशासकीय प्रशासकीय मंडळातील ७ सदस्यांची निवड दिनांक २९ मे २०२१ रोजी झालेली आहे. सरकार बदलाच्या हालचाली नंतर काही बाजार समितीच्या सदस्य बदलांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार निरपेक्ष व्हावा यासाठी. तसेच ही बाजार समिती शेतकऱ्यांची मालमत्ता व अनेक व्यापाऱ्यांचे भविष्य यावर अवलंबून आहे. या बाजार समितीच्या हिताचा विचार करून विद्यमान प्रशासक अनिल महाजन यांनी राजकारण विरहित सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्त्यांची नेमणूक या अशासकीय प्रशासकीय मंडळात व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाला पत्र दिले होते. यावरून पणन विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय अव्वर सचिव प्रमोद वळंज यांनी सदर पत्रानुसार आवश्यक ती कारवाई करावी यासाठी पणन संचालक, पुणे यांना शिफारस केली आहे व तसे निर्देश दिले आहेत. यावरून पणन संचालक, पुणे यांनी पणन उपसंचालक रविंद्र गोसावी यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांना शासनाने केलेल्या निर्देशानुसार कारवाई करावी असे पत्र जळगाव जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांना दिले आहे. मुख्य प्रशासक अनिल महाजन यांच्यासह खालील एकूण ११ सदस्यांची अशासकीय प्रशासकीय मंडळात नेमणूक करण्यात यावी याबाबत कळविले आहे.
अनिल बाबूलाल महाजन, पाचोरा (मुख्य प्रशासक) ॲड. अभय पाटील, शिंदाड (प्रशासक) चंद्रकांत धनवडे, पाचोरा (प्रशासक), युवराज रामसिंग पाटील, भडगाव, (प्रशासक), उद्धव मराठे (पिपंळगाव), सचिन अशोक सोमवंशी (पाचोरा), ॲड. अविनाश भालेराव (पाचोरा), डॉ. शेखर कौतिक पाटील (वाडी शेवाळे), प्रदीप नाना पाटील (अंतुर्ली), सुनील राजमल संघवी, (खेडगाव), ईश्वर कडू चौधरी (कळमसरा) या सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्त्यांनी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पहावा. अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची व पाचोरा तालुक्यातील सर्व जनतेची मागणी आहे.