Home Cities भडगाव राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भडगाव तालुकाध्यक्षपदी अनिल धनराज पाटलांची नियुक्ती

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भडगाव तालुकाध्यक्षपदी अनिल धनराज पाटलांची नियुक्ती

0
103

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भडगाव तालुकाध्यक्ष पदी शिंदी येथील विकासो चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य अनिल धनराज पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. निवडीचे पत्र जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या सहीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाच्या पदाधिकारी उपस्थित होते. अनिल पाटील हे भडगाव तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी असून सर्व सामान्य घरातुन समाजकारण व राजकारणात आले. सुरुवातीला कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेनेत असताना अनेक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. गोरगरीबाच्या कामांसाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या ते शिंदी गावाचे विकासो चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. या निवडीचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound