जखमी शेतमजुरांची अनिल चौधरी यांनी घेतली भेट

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील आदिवासी भागातील जिन्सी तांडा येथे वादळी पावसामुळे शेतमजुरांच्या अंगावर वीज कोसळल्याने एकाच घरातील १० शेतमजूर जखमी झाल्याची माहिती मिळताच तात्काळ जखमी झालेल्यांच्या घरी जाऊन भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी भेट घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी आठ वाजल्यापासून जखमी झालेल्या शेतमजुरांच्या घरी भूसावळ येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी  भेटी देऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. या दुःखाततून सावरण्यासाठी त्यांना धीर दिला. जखमीग्रस्त असलेल्या शेतमजुरांनाची भेट घेऊन. प्रत्यक्ष त्यांची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या त्यांच्या कडे  व्यथा मांडल्या.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.