अनिल बारोले अपघात : ठेकेदार, अभियंत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

nivedan newss

जळगाव प्रतिनिधी । शहरातील चित्राचौकात 13 रोजी अनिल बारोले यांचा तर 14 रोजी पप्पू सोनवणे यांचा रस्त्यावरील साईड पट्टे, खड्ड्यांमुळे बळी पडले आहे. याप्रकरणी रस्त्यावरील संबंधीत ठेकेदार आणि महानगरपालिकेचे शहर अभियंता यासह अधिकारी यांच्या दुर्लक्षपणा केल्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माहितीचा अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, 13 जुलै रोजी सायंकाळी 6.15 वाजेच्या सुमारास चित्राचौकात खड्ड्यामुळे दुचाकी रस्त्यावरून घसरून अनिल श्रीधर बोरोले हे ट्रकखाली चिरडल्याने जागीच दुदैवी मृत्यू झाला. तर ही घटना ताजी असतांना 14 जुलै रोजी देखील रस्त्यावरील खराब साईडपट्ट्यांमुळे उज्ज्वल उर्फ पप्पू सोपान सोनवणे (वय-26) रा. सावखेडा बु. ता जाळगाव या तरूणाचा देखील मृत्यू झाला. या दोन्ही घटना रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि साईडपट्ट्या पुर्ण खराब झाल्याने बळी पडले आहे. यापुर्वी देखील अनेकांचे बळी गेले आहे. या दोन दुर्घटनेमुळे एक प्रकारे हा खून असून रस्ते बनविणारे ठेकेदार आणि महानगरपालिके शहर अभियंता आणि सहकारी अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

यात रस्ते बनविणारे ठेकेदार आणि रस्त्यांची देखरेख ठेवणारे जबाबदार अधिकारी यांच्यावर भादवि 1860 नुसार 304-अए 337ए 116 – अ, 188, 34 प्रमाणे फैजदारी गुन्हा दाख व्हावा. अशी मागणी माहिती आरटीआय कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. या निवेदनावर निहाल अहमद, सलिम शेख, शिवराम पाटील, इरफान शेख, अमोल कोल्ह, गुरूनाथ सैंदाणे, रागीब अहमद आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content