

जळगाव : विजय पाटील

भाजपचे खासदार ए.टी.नाना पाटील हे फक्त कागदावरचे खासदार असल्याचा हल्लाबोल करत येत्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मतदार जळगाव लोकसभा मतदार संघातून विजयी होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स’ शी बोलतांना व्यक्त केला आहे.
आज जळगावात राष्ट्रवादीचे सोशल मिडिया संदर्भात पक्ष कार्यालयात एक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा भरातील पदाधिकारी कार्यकर्ते आलेले होते. या प्रसंगी राष्ट्रवादीचे लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार असलेले उमेदवार अमळनेर येथील अनिल पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी ‘लाईव्ह ट्रेंड्स’च्या प्रतिनिधीने त्यांना बोलते केले असता,त्यांनी महत्वपूर्ण विषयावर वक्तव्य केले. अनिल पाटील यांनी विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांना कागदावरील खासदार म्हणून संबोधले तर राष्ट्रवादी पक्ष ज्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी देईल, त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. दरम्यान, अनिल पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदार संघात भेटीगाठी सुरु केल्या असल्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे.
खालील व्हिडीओमध्ये पहा- अनिल भाईदास पाटील नेमके काय म्हणाले ते…!


