पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पिंपरी-चिंचवड येथे २७ मे रोजी रात्री प्रेम प्रकरणातून टेल्को कंपनी जवळ एक्स बॉयफ्रेंड प्रेयसीला भेटल्याचा रागातून दुसऱ्या प्रियकराने पहिल्या प्रियकराला कारने उडवले. या घटनेत आधीचा प्रियकर हा गंभीर जखमी झाला आहे. निलेश शिंदे असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुशील भास्कर काळे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, आरोपी सुशील भास्कर काळे व जखमी निलेश शिंदे या दोघांचे एकाच मुलीवर प्रेम आहे. मुलीचे आरोपी सुशील भास्कर काळेवर प्रेम आहे. तर निलेश शिंदे हा तिचा आधीचा प्रियकर होता. दोघांचे ब्रेकअप झाले आहे. दरम्यान, ब्रेकअप झाले असतांना देखील निलेश शिंदे हा मुलीला सारखा त्रास देत असे. दरम्यान, ही बाब तिने सुशीलला सांगितली. दरम्यान, सोमवारी रात्री १ च्या सुमारास निलेश शिंदे हा त्याचा जुन्या प्रेयसीला दुचाकीवरून भेटायला आला. ही बाब सुशील काळेला प्रेयसीने कळवली होती. नीलेश शिंदे हा टेल्को रोडवर आधीचया प्रेयसीशी बोलत थांबला होता. याच वेळी सुशील भास्करने त्याची गाडी भरधाव वेगात चालवत निलेश शिंदेच्या दुचाकीला धडक देत त्याच्या अंगावर घातली. या घटनेत नीलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला स्थानिक नागरिकांनी तातडीने दवाखान्यात नेले. या घटनेची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत सुशील काळे याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.