खामगाव, अमोल सराफ | ‘लहानग्यांना जिचं आकर्षण असतं, ती चिमणी आता दिसेनाशी झाली आहे. आगामी काळात ती फक्त चित्रातच दिसेल का ? असा प्रश्न निर्माण व्हावा इतक्या झपाट्याने चिमण्यांची संख्या कमी होत असतांना चिमणी जगवण्यासाठी गेल्या १५ वर्षापासून धडपडणाऱ्या कला शिक्षकाच्या परिसरात येते चिमण्यांच्या गुंजारवने लोकांना जाग येते. ‘जागतिक चिमणी दिवसा’निमित्त जागतिक चिमणी दिवसानिमित ‘लाईव्ह ट्रेंड न्यूज’चा हा स्पेशल रिपोर्ट..
चिऊ काऊच्या गोष्टीत ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ अशा बडबड गीतातून नेहमी लहानग्यांना जिचं आकर्षण असतं, रडणाऱ्या लहान मुलांना उगं करण्यासाठी आपण तिला साद घालतो ती चिमणी आता दिसेनाशी झाली आहे. आगामी काळात ती फक्त चित्रातच दिसेल का ? असा प्रश्न निर्माण व्हावा इतक्या झपाट्याने चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. याच अनुषंगाने 2010 पासून दि.20 मार्च ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ अर्थातच ‘जागतिक चिमणी दिवस’ साजरा करण्यात येत आहे.
काळाच्या ओघात आणि सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे त्यासह अनेक कारणे कमी होणाऱ्या चिमण्याच्या वाचवण्याचे अनेक प्रयत्न होत आहे. त्यात गेल्या 15 वर्षापासून एक अवलीया चिमण्यासाठी झटतो आहे. इतरांनाही त्यासाठी साद घालतो आहे. आपल्या अवतीभोवती चिवचिवाट करणारी आणि पहाटेच्या रम्य वातावरणात जिच्या गुंजारवने जाग यायची अशी चिमणी शहरातून गायब झाली आहे. चित्रकला शिक्षक संजय गुरुव यांची चित्रात रंग भरता भरता चिमणी जगवण्यासाठी गेल्या 15 वर्षापासून धडपड सुरू आहे.
कुतूहलातून आणि प्रेमातून संजय गुरव यांनी चिमण्यांविषयी इत्यंभूत माहिती गोळा केली. त्यांना चिमण्याचा विकिपिडिया म्हटले तरी वावगे ठरणार नाही. चिमणीचं घरटे कसं असतं ? त्यांची संख्या कमी होण्याचंमागचे कारण तरी काय ? अशा प्रश्नांची उत्तरं त्यांना चिमण्यासोबत राहतांना, चिमण्यांच्या सहवासातून मिळालीय. संजय गुरव यांच्या यांच्या घरासमोर 40 ते 50 चिमण्यांचे घरटे आहेत. प्रत्येक घरट्यात चिमण्याचे वास्तव्य आहे. हे पाहण्यासाठी म्हणून दूर दूर वरून लोक येथे भेट द्यायला येतात.
संजय गुरव यांनी चिमणी प्रेमाचं हा छंद स्वताः पुरता मर्यादित ठेवला असा नाही. त्यांनी आतापर्यंत तब्बल 35 हजार घरटे राज्यासह देशभरात पोहोचली आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर केला. तर चिमण्यासाठी संजय गुरव यांनी एक यशस्वी फिडरही बनवली आहे. या कामात इतर पक्षीप्रेमीही त्यांना सहकार्य करत आहे. आज गरज आहे चिमण्यासाठी अन्न आणि निवारा उपलब्ध करून देण्याची.. जागतिक चिमणी दिनाच्या अनुषंगानं जर आपण हे केलं तर आपल्या अवती भवती पुन्हा एकदा चिमण्याचा तो चिव – चिवचिवाट तो गुंजारव ऐकायला मिळेल यात शंका नाही.
व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/495022992114035