मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । मातोश्रीवर पहारा देणाऱ्या असंख्य शिवसैनिकांमध्ये असलेल्या एक ९२ वर्षीय आजीबाई पहारा देत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. या आजीबाई नेमक्या कोण याची सर्व सामान्यांना उत्सुकता होती. आता प्रत्यक्ष मातोश्रीच या आजीबाईंच्या भेटीला आल्या आहेत.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ‘मातोश्री’च्या आत जाण्याचा निश्चय केला होता. आणि यांच्या विरोधात मातोश्रीवर अनेक शिवसैनिकांनी पहारा दिला. यात एक आजीबाई पहारा देत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. या आजीबाई नेमक्या कोण याची सर्व सामान्यांना उत्सुकता होती. आता प्रत्यक्ष मातोश्रीच या आजीबाईंच्या भेटीला आल्या आहेत.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचाविरोधात ‘मातोश्री’ बाहेर पहारा देणाऱ्या चंद्रभागा शिंदे या 92 वर्षीय आजींच्या घरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब भेट दिली आहे.