भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रांताधिकारी तथा नगरपालिकेचे मुख्य प्रशासक जितेंद्र पाटील यांनी नगरपालिकेची झाडाझडती करत चक्क मुख्य इमारतीला कुलूप ठोनूक कर्मचार्यांची हजेरी घेतल्याची घटना घडली आहे.
भुसावळ शहरातील गोपाळ नगर भागातील नगरपालिका कार्यालयात सोमवारी न.पा.प्रशासक या नात्याने सकाळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी अचानक भेट दिली. यावेळी प्रथम उपविभागीय अधिकारी यांच्या सांगण्यावरून नगर परिषदेच्या इमारतीला टाळे ठोकून अधिकारी व कर्मचारी कामावर वेळेवर हजर आहेत की,नाही यासंदर्भात प्रत्यक्षात पाहणी केली.यादरम्यान वेळेवर काम न करणार्या दहा अधिकारी व कर्मचार्यांना नोटीस देण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून नगर परिषदेवर प्रशासक बसले आहे.सध्याच्या काळात नगर परिषदेचा करोभार प्रशासकीय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील यांच्याकडे आहे.नगर परिषदे संदर्भात नागरिकांची मोठ्या प्रमाणात ओरड असल्याने तसेच वेळेवर नागरिकांची कामे होत नसल्याने या अनुषंगाने काल त्यांनी स्वत: सकाळी दहा वाजेला नगर परिषद कार्यालयाला अचानक भेट दिली व प्रथम कर्मचार्यास नगर परिषद इमारतीला बाहेरून कुलूप लावण्यात सांगितले व इमारतीच्या आत सर्व अधिकार्यांना प्रत्यक्ष भेट दिली.किती वाजेला कामावर येतात व किती वाजेला घरी जातात याबाबत माहिती जाणून घेतली.तसेच अधिकारी व कर्मचारी वेळेवर कामावर येत नाही असे दहा अधिकारी व कर्मचार्यांना नोटीस देण्यात आली.