…आणि तिने स्वतःच्या रक्ताने बनविले ‘द काश्मीर फाईल्स’चे पोस्टर

अभिनेता विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केली पोस्ट होतेय व्हायरल

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । सोशल मिडीयावर विविध विषयावर नागरिक आपलं मत व्यक्त करत असतात. आपल्या कलेची अभिव्यक्ती करत भावना व्यक्त करत असतात. एका तरुणीने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे पोस्टर आपल्या रक्ताने बनविले असून अभिनेता विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी आपल्या पोस्ट शेअर केल्या आहेत विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यात एका चाहतीने चक्क तिच्या रक्ताने पोस्टर बनवले असल्याचे म्हणत विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.

हे रक्ताने काढलेलं पोस्टर शेअर करत विवेक म्हणाले, “OMG! अविश्वसनीय. मला काय बोलावे ते कळत असून मंजू सोनीजी यांचे आभार कसे मानावे. तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. जर कोणी त्यांना ओळखत असाल, तर कृपया त्यांचा नंबर मला DM मध्ये शेअर करा.” असे आवाहन असे अभिनेता विवेक अग्नीहोत्री यांनी करत #RightToJustice” ट्वीट केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!