Home Cities पाचोरा पाचोऱ्यात भाजपातर्फे आनंदोत्सव (व्हिडिओ)

पाचोऱ्यात भाजपातर्फे आनंदोत्सव (व्हिडिओ)

0
25

पाचोरा – नंदू शेलकर । राज्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याचा निर्णय भाजपने घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि उपमुख्यमंत्रिपद भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या निर्णयाचे पाचोऱ्यात भाजपतर्फे आनंदोत्सव करण्यात येत आहे.

सकाळी ११:३० वाजता भाजपा कार्यालया पासुन भव्य रॅली काढण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर ढोल ताश्यांच्या गजरात फटाके वाजवून तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.‌

याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील, शहर अध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, रेखा पाटील, माजी नगरसेवक विष्णु अहिरे, माजी शहर अध्यक्ष नंदु सोमवंशी, हिम्मतसिंग निकुंभ, गोविंद शेलार, बाळकृष्ण धुमाळ सह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदार संघातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/399895002172850

 


Protected Content

Play sound