Home Cities अमळनेर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडविले; तरूण जागीच ठार !

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडविले; तरूण जागीच ठार !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावाजवळ जात असताना दहिवद फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. या संदर्भात शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगलसिंग अमरसिंग पावरा (वय-३५, रा. सावखेडा ता.अमळनेर) हा तरुण शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्याची दुचाकी क्रमांक (एमएच ५४ ए ८९०२) ने अमळनेर शहराकडून गावात सावखेडा येथे येत असताना रस्त्यावरील दहिवद फाट्याजवळ समोरील येणारी अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत मंगलसिंग पावरा हा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या संदर्भात त्याचे नातेवाईक अजय पावरा यांनी यासंदर्भात अमळनेर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता धडक देणाऱ्या वाहनावरील अज्ञात चालकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound