चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वडगाव ते रहिपूरी दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने मागुन जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर महिला जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुलसीदास शंकर वाघ (वय-३४) रा. भोरस, ता. चाळीसगाव हे त्यांचे वडील शंकर वाघ आणि पत्नी मिना वाघ यांच्यासोबत गुरूवारी १४ जुलै रोजी दुचाकी (एमएच १९ डब्ल्यू ३६५५) ने सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात वडगाव ते रहिपूरी रस्त्याने जात होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणारी अज्ञात पिकअप व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात शंकर वाघ हे खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर मिना वाघ या जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन घटनास्थळाहून पसार झाला होता. याप्रकरणी तुलसीदार वाघ यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्यातक्रारीवरून अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रकाश कोळी करीत आहे.