रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील खिर्डी येथील एका व्यक्तीस काल (दि.११) रात्री ९.०० च्या सुमारास रावेर-ब-हाणपूर मार्गावर अज्ञात व्यक्तीने पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे ५५ हजारांचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली.
अधिक माहिती अशी की, सुरेश विश्वनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार व्ही.एस.नाईक महाविद्यालयाजवळ रात्री एका अज्ञात व्यक्तीने पोलीस असल्याची बतावणी करून १२ ग्राम व १० ग्राम वजनाच्या दोन अंगठ्या फसवणूक करून काढून नेल्या. याप्रकरणी पोलिसांनी भा.द.वि. कलम १७० व ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार सतीश सानप पुढील तपास करीत आहेत. दरम्यान एस.डी.पी.ओ. श्री पिगंळे व पो.नि. रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.