Home क्राईम वरणगाव-भुसावळ मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्ती ठार !

वरणगाव-भुसावळ मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्ती ठार !


वरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव ते भुसावळ रोडवर असलेल्या बजरंग ढाब्यासमोर एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वरुणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वरणगाव ते भुसावळ महामार्गावर २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती बजरंग ढाब्यासमोरून सार्वजनिक रस्त्याने जात असताना, एका भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर संबंधित वाहन चालकाने जखमीला कोणतीही मदत न करता किंवा अपघाताची खबर पोलिसांना न देता घटनास्थळावरून पसार झाला होता. याप्रकरणी प्रवीण महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे


Protected Content

Play sound