जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून एक अनोळखी व्यक्ती पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव पाचोरा दरम्यान शिरसोली रेल्वे स्टेशन जवळ खांबा क्रमांक ४०९/२४ ते २६ दरम्यान गोवा एक्सप्रेसमधून पडल्याने अनोळखी ३५ ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. स्टेशन प्रबंधक योगेश खांबे यांनी शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण पाटील यांना खबर दिली. त्यानुसार पोलीस पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विश्वनाथ गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड करीत आहे.