वृद्ध महिलेचे बंद घर फोडले; ७० हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनीतील वृद्ध महिलेचे बंद घर फोडून घरातून ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना शुक्रवार ७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कमल किशोर गौरीशंकर पांडे वय-६४ या वृद्ध महिला आपल्या परिवारासह नागेश्वर कॉलनीत वास्तव्याला आहे. ६ जून रोजी सकाळी ११ वाजता ते कामाच्या निमित्ताने घर बंद करून बाहेरगावी गेल्या होत्या. या घर बंद असल्याचा फायदा घेत असल्याने अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्याची दागिने आणि रोकड असा एकूण ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. हे घटना शुक्रवारी ७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता उघडकीला आली आहे. त्यानंतर वृद्ध महिलेने रामानंदनगर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सपकाळे हे करीत आहे.

Protected Content