चिखली येथे ज्वारीचे पोते चोरणाऱ्या तीन संशयित अटकेत; यावल पोलीसात नोंद

फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चिखली येथून ज्वारीच्या पोती चोरणाऱ्या तीन संशयित आरोपींना फैजपूर पोलीसांनी अटक केली असून तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चिखली येथील सोपान वासुदेव पाटील या शेतकऱ्याची १६ रोजी ज्वारीची पोती चोरी झाली होती. याप्रकरणी यावल पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत ज्वारीची पोती चोरणाऱ्या तीन संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील ६ हजार ५०० रुपयाचे १३ पोती ज्वारी हस्तगत करण्यात आली आहे.

जितेंद्र ब्रिजलाल पाटील, कृष्णा वना बादशाह व नितीन प्रवीण तायडे अशी अटक केलेल्या तीन आरोपीची नावे आहेत. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चिखली येथील सोपान वासुदेव पाटील या शेतकऱ्याची 16 रोजी ज्वारीची पोती चोरी झाली होती. या प्रकरणी फैजपूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सपोनि प्रकाश वानखडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पो.कॉ. गोकुळ तायडे, किरण चाटे, अनिल महाजन, महेश वंजारी, उमेश सानप यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Protected Content