किरकोळ कारणावरून वृध्दाला लाकडी दांडक्याने केली मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इतक्या रात्री घरासमोर का आला असा जाब विचारल्याच्या कारणावरून एकाने ६५ वर्षीय वृध्दाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावात शनिवारी १८ मे रोजी रात्री १ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी १२.३० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावात निंबा सुकदेव सोनवणे वय ६५ हे वृध्द वास्तव्याला आहे. शनिवारी १८ मे रोजी मध्यरात्री १ वाजता गावात राहणारा केशव रूपा पाटील हा तरूण त्यांच्या घरासमोर आला. त्यावेळी निंबा सोनवणे यांनी तु इतक्या रात्री आमच्या घरासमोर का आला असा जाब विचारला. याचा राग आल्याने केशव पाटील याने शिवीगाळ करत लाकडी दांडका निंबा सोनवणे यांच्या कपाळ व तोडावर मारून दुखापत केली. याप्रकरणी निंबा सोनवणे यांनी दुपारी १२.३० वाजता भुसावळ तालुका पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी केशव रूपा पाटील याच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुभान तडवी हे करीत आहे.

Protected Content