भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा येथील पाण्याच्या टाकीजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून एका वृध्दाला दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना सोमवारी ३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा गावात लिलाधर काशिराम पाटील वय ६३ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गावातील पाण्याच्या टाकीजवळ लिलाधर पाटील हे उभे असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा सोपान काशिनाथ् पाटील याने दारूच्या नशेत येवून लिलाधर पाटील यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण केली. आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत लिलाधर पाटील यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणारा सोपान काशिनाथ पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भोई हे करीत आहे.