विद्याविहार कॉलनीत तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । आईचे नाव घेऊन मस्करी करत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाला शिवीगाळ करत डोक्यात लोखंडी टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना अमळनेर शहरातील विद्याविहार कॉलनीत रविवारी १२ मे रोजी रात्री ११.३० वाजता घडली. याप्रकरणी सोमवारी १३ मे रोजी रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अंकित चंद्रकांत देशमुख वय-२९ रा. विद्याविहार कॉलनी, अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांधकाम ठेकेदाराचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवार १२ मे रोजी रात्री ११.३० वाजता अंकित देशमुख आणि रवींद्र पाटील हे गप्पा मारत होते. त्यावेळी रविंद्र पाटील यांने अंकितच्या आईचे नाव घेऊन मस्करी करू लागला. त्यावर अंकितने जाब विचारला, याचा राग आल्याने रविंद्र पाटील याने शिवीगाळ करत लोखंडी रोड अंकितच्या डोक्यात टाकुन गंभीर दुखापत केली. दरम्यान जखमी झालेल्या अंकितला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर सोमवारी १३ मे रोजी रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार मारहाण करणारा रविंद्र पाटील यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील हे करीत आहे.

Protected Content