नागपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | इन्स्टाग्रामवर मैत्री करीत ४९ वर्षीय महिलेवर अत्याचार करीत सात लाखाची खंडणी उकळल्याची नागपूरात उघडकीस आली. अजनी पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. साहील मल्होत्रा (वय ३० रा.लुधियाना) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आणि महिलेची इन्ट्राग्रामवर २०२२ ला ओळखी झाली. त्यानंतर ते एकमेकांशी बोलू लागले. दरम्यान त्याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तो नागपुरात आला. पीडित महिलेच्या घरी गेला. संशयित आरोपीने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. महिला बेशुद्ध झाली. त्याने तिच्यावर अत्याचार करीत, त्याने मोबाइलद्वारे अश्लील विडीओ काढले. ती व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने महिलेकडून सात लाख रुपये उकळले. मात्र, पुन्हा ती क्लिप नातेवाइकांना पाठविण्याची धमकी दिली. महिलेने अजनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांची चौकशी करीत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.