भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील किन्ही गावात राहणाऱ्या ६६ वर्षीय वृध्द महिला स्वयंपाक करतांना अचानक लागलेल्या आगीमुळे ५५ टक्के भाजल्या गेल्याची घटना १८ जानेवारी रोजी घडली होती. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आशाबाई अमृत घुले वय ६६ रा. किन्ही ता. भुसावळ असे मयत वृध्द महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, अशाबाई अमृत घुले या वृध्द महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होत्या. १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता स्वयंपाक करतांना अचानक लागलेल्या आगीत त्या ५५ टक्के भाजल्या गेल्या होत्या. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारा सुरू असतांना मंगळवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश राठोड हे करीत आहे.