धक्कादायक : घर नावावर करण्यासाठी वृध्दाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घर नावावर करून देण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका वृध्दाला शिवीगाळ करत अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रयत्न केल्याचा धक्कादायक घटना सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे, याप्रकरणी मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ख्वाजा हसन अब्दुल गणी वय ७२ रा. बाहेरपूरा महोल्ला, अमळनेर हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ते त्यांच्या घरी असतांना गांधी नगरात राहणारे गुलाम अब्दुल रहेमान तेली यासह इतरांनी त्यांच्या घरासमोर येवून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ख्वाजा गणी यांना घर नावावर करून दे अशी दमदाटी करू लागली. त्यावर ख्वाजा यांनी घर नावावर करून देण्यास नकार दिला. या कारणावरून गुलाम अब्दुल रहेमान तेली, रफिक अब्दुल रहेमान तेली, रहिम रमजान तेली, कांती रमजान तेली, जिशान कमाल तेली, असीम कमाल तेली, बाबु रमजान तेली, सादीक बाबु तेली, आसीफ बाबु तेली सर्व रा. गांधी नगर, अमळनेर यांनी वृध्दाला मारहाण करत अंगावर पेट्रोल टाकून दिले. त्यानंतर आगपेटीने पेटवून जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ख्वाजा हसन अब्दुल गनी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ह्या करीत आहे.

Protected Content