जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रेम विवाहाच्या वादातून काल पिंप्राळ्यात तरूणाचा खून झाल्याची घटना घडल्याचे पडसाद उमटले असून संशयितांच्या घरांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथे तरुणाच्या खून प्रकरणात प्रकरणामध्ये संशयित आरोपींचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीला सोमवारी २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उघडलेला आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आक्रोश करत हल्लेखोरांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात प्रेमविवाह केल्याच्या जुन्या मुकेश रमेश शिरसाठ (वय-२८) या तरुणाचा कोयता, चाकूने वार करून गंभीर जखमी करत निर्घृण खून केल्याची घटना रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता घडली होती. तरुणाच्या घरातील ६ ते ७ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. यासंदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी ७ संशयित आरोपींना जणांना अटक केली आहे.
दरम्यान, आज सोमवारी २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान अटक केलेल्या आरोपींना कठोर कारवाई करत त्यांना फाशी करावी, अशी मागणी करत कुटुंबीयांनी पिंप्राळा हुडको परिसरामध्ये एकच आक्रोश केला होता.
दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्या आणि हल्लेखोर यांचे बंद घर पेटवून देण्याच्या प्रयत्न केला आहे. या परिसरात जाळपोळ होत असल्याची माहिती मिळाल्याने विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि पथक घटनांसाठी दाखल झाले. दरम्यान आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करू असा इशारा मयत मुकेश शिरसाठ यांच्या पत्नी, आई आणि बहीण यांनी दिला आहे.