भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वरणगाव येथील ५७ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शांताराम मोतीराम तेली (वय-५७) रा. वरणगाव ता. भुसावळ असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांताराम तेली हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते.१७ डिसेंबर रोजी रोजी दुपारी ३ वाजता त्यांनी काहीतरी विषारी औषध घेतले होते. त्यामुळे त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांचे उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नागेंद्र तायडे हे करीत आहे.