नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान आजपासून (२ फेब्रुवारी) पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी खुले होत आहे. 15 एकरांवर पसरलेल्या या प्रसिद्ध बागेत यावेळी 85 हून अधिक प्रजातींच्या फुलांसोबतच फुलांचे घड्याळही लावण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी अमृत उद्यान येथे उद्यान उत्सव 2024 चे उद्घाटन केले.
राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सामान्य नागरिक 2 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत अमृत उद्यानाला भेट देऊ शकतात. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने तिकीट बुक करता येईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही ५ ते ६ लाख लोक येण्याची शक्यता आहे. यावेळी बागेत सेल्फी पॉइंटही बनवण्यात आला आहे.