पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार किशोर पाटील यांच्या गद्दारीचा आणि खोटारडेपणाचा पर्दाफाश आपण व्हिडीओ दाखवून करणार असल्याची घोषणा आज भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
आमदार किशोर पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व त्यांचे काका सतीष शिंदे यांनी बाजार समितीची साडेनऊ कोटींची जागा सव्वा चार कोटीत स्वतः च्या घशात घातली असा आरोप केला होता. शिंदे कुटुंबाने कायद्याचा गैर अर्थ लावून आमच्या सात संचालकांना अपात्र केले,आताही बाजार समितीच्या निवडणुकीत लाखो रुपये उधळून सत्या काबीज करुन करोडो रुपयांचा मलिदा खाण्याचा शिंदे कुटुंबीयांनी घाट घातल्याचा आरोप किशोर पाटील यांनी सतीष शिंदे व अमोल शिंदे यांचेवर केला होता.
याला उत्तर देण्यासाठी अमोल शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार घेत आमदार किशोर पाटील यांना थेट आव्हान दिले. ज्यांनी स्वतः चे काका व शिवसेनेशी गद्दारी केली व त्यांना गद्दारी अन् ५० खोक्याचा कलंक लागलेला आहे तो कधीही पुसला जाणार नाही. येत्या २४ तारखेला मी आमच्या पँनलच्या प्रचारार्थ पाचोरा येथे जाहीर सभा घेणार आहे,या सभेत मी एल र्डी स्क्रीन लावून आमदार किशोर पाटील यांच्या खोटारडेपणाच्या मुखवट्याचा पर्दाफाश करणार आहे. असल्याचा इशारा अमोल शिंदे यांनी दिला.
या पत्रकार परिषदेत आ. किशोर पाटील व मा. आमदार दिलीप वाघ यांच्या वर अमोल शिंदे यांनी टिकास्त्र सोडले. यावेळी आ. किशोर पाटील यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना अमोल शिंदे यांनी सांगितले की, मी ज्यावेळी बाजार समितीची जागा विकत घेतली त्यावेळी बाजार समितीने रितसर दोन मराठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती. जाहिराती नंतर ५ लोकांनी लिलावात बोली लावली. त्यावेळी पाच मध्ये एक आ. किशोर पाटील यांचा जवळचा व्यक्ती बोली लावत होता. मात्र मी ज्यादा बोली लावुन जागा विकत घेतली. आमदाराच्या माणसाने अतिशय कमी बोली लावुन जागा स्वतः च्या घशात घालण्याचा कट रचला होता. दरम्यानच्या काळात बाजार समितीला भरघोस उत्पन्न सुरू होते. यांनी स्वतः च्या स्वार्थासाठी बाजार समितीवर करोडो रुपयांचे कर्ज करुन ठेवले. मा. आ. दिलीप वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीत एन. सी. पाटील हे सभापती असतांना जागा विक्रीचा ठराव करण्यात आला होता. तर आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती असलेल्या कै. ऍड. दिनकर देवरे यांची सही व बाजार समितीच्या सचिवांच्या सहीने मी रितसर जागा खरेदी केली आहे.
अमोल शिंदे पुढे म्हणाले की, मागील काळात शिवसेनेची सत्ता असतांना व रावसाहेब पाटील हे चेअरमन असतांना वरखेडी येथील डांभुर्णी रस्त्यावरील गुरांच्या बाजाराची जागा, पाचोरा बाजार समितीच्या मागील जागा विकुन आजी – माजी आमदारांनी मलिदा चाखला. मागील दोन वर्षांपूर्वी महाआघाडीची सत्ता असतांना आमदार किशोर पाटील यांनी माजी आ. दिलीप वाघ यांना मुख्य प्रशासक नेमण्यासाठी स्वतःच्या लेटर पॅडवर शिफारस पत्र देऊन त्यांची नियुक्ती करुन त्यावेळी दोघांनी मिळुन मलिदा खाल्ला. सतीष शिंदे हे ऐन कोरोना काळात सभापती असतांना वरखेडी बाजारात केवळ ४० हजार रुपयांचे उत्पन्न येत असतांना त्यांनी ते उत्पन्न १ लाखांवर नेवुन यांनी केलेल्या कर्जाचे व्याज फेडण्याचे पुण्य केले. मात्र यांनी आजच्या घडीलाही बाजार समितीवर ६ कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवला असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, आज अमोल शिंदे यांनी आ. किशोर पाटील यांना थेट आवाहन देत दोघांनी एकत्रित पत्रकार परिषदेत घ्यावी. खर्या बाबी उघडकीस आणु. आणि दुध का दुध आणि पाणी का पाणी समोर येईल. भडगावचे तालुका अध्यक्ष अमोल पाटील यांनी १८ उमेदवारांचा परिचय करून दिला. यावेळी भडगाव येथील भाजपाचे जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, तालुका अध्यक्ष अमोल नाना पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सतीष शिंदे, शहर अध्यक्ष रमेश वाणी, ऍड. विश्वास भोसले, पंचायत समितीचे मा. उपसभापती कैलास चौधरी, ज्ञानेश्वर सोनार,गोविंद शेलार, ईश्वर पाटील, समाधान मुळे, परेश पाटील, उपस्थित होते.