एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना आघाडी मिळाली आहे.
एरंडोल विधानसभा मतदारसंघात् यंदा महायुतीच्या वतीने आमदार चिमणराव पाटील यांचे सुपुत्र तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी मिळाली. याच्या सोबत माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी देखील अपक्ष उमेदवारी केली. सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संभाजीराजे पाटील आणि धरणगाव येथील मोठे ठेकेदार भगवान महाजन यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी केली.
निवडणुकीच्या प्रचारात येथे मोठी चुरस दिसून आली. अमोल पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा तर अभिनेता गोविंदा यांचा रोड शो झाला. डॉ. सतीश पाटील यांच्यासाठी शरद पवार यांची सभा झाली. सर्व उमेदवारांनी मोठ्या प्रचार फेऱ्या आणि कॉर्नर सभा यांना प्राधान्य दिले. येथे बहुरंगी लढत झाल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. यातच येथून 68.76 इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यामुळे वाढलेला टक्का हा कुणाला लाभदायक ठरेल याबाबत मोठी चर्चा रंगली होती.
या पार्श्वभूमीवर येथे आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. यात महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना ५१४५ इतकी मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. सतीश पाटील यांना ११७५ तर भगवान महाजन यांना ३०९८ मते मिळाली आहेत.