यावल नगरपरिषदेत पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या कामाचा अमोल जावळेंनी घेतला आढावा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-यावल विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे यांनी यावल नगर परिषदला अचानक भेट देवुन प्रशासनाच्या संपुर्ण कामकाजाचा आढावा घेतला, दरम्यान त्यांच्या या भेटीमुळे नगर परिषदच्या गोंधळेल्या कारभाराला गती मिळून नागरीकांच्या समस्यांचे निराकरण होईल अशी अपेक्षा यावल नागरीकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नुकत्याच संपलेल्या रावेर यावल विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणुन अमोल हरिभाऊ जावळे हे मोठया मताधिक्याने दणदणीत विजयी होवुन आमदार झाले असून , दरम्यान ३ डिसेंबर २०२४ रोजी आमदार अमोल जावळे यांनी नगर परिषद यावल येथे अचानक भेट देवुन अधिकारी यांच्याशी बैठक घेत शहरातील विविध समस्यांबाबत सविस्तर माहिती घेतली या बैठकीत नगर परिषदचे मुख्यधिकारी श्रीकांत गवई व पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांच्या बरोबर चर्चा करून यावल शहर स्वच्छ झाले पाहिजे.

कचरा मुक्त स्वच्छ शहर करण्याबाबत चर्चा केली आज शहरात ठीकठिकाणी कचरा व घाणीचे साम्राज्य दिसुन येत असल्याने आमदार अमोल जावळे यांनी नगरपरिषदच्या स्वच्छता विभागाशी संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छता कडे लक्ष द्या, अशा सुचना देवुन शहर स्वच्छ व सुन्दर ठेवण्याचे आदेश दिले होते. यांची दक्षता घेऊन नगरपरिषद कर्मचारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. गुड मॉर्निंग पथक, मोकाट फिरणारी गुर ढोर पकडणे ठिक ठिकाणी कचरा साचलेला आहे. यांच्याकडे दुर्लक्ष न करता स्वच्छता कडे लागले आहे.

आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्यामुळे व मुख्याधिकारी श्रीकांत गवई व त्यांच्या सहकार्यांच्या प्रयत्नातुन यावल शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान आमदार अमोल जावळे यांनी यावल शहरा करीता नागरीकांची पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेता यावल नगर परिषदच्या माध्यमातुन शहरात होणारा पाणीपुरवठा मुबलक व सुरळीत व्हावा यासाठी शासनाकडून ५६ कोटींचा निधी मंजुर करून आणला असुन, या निधीच्या माध्यमातुन शहरातील पेयजल समस्या कायमची सुटेल.

Protected Content