Home Cities यावल जिल्ह्यात ‘येथे’ होणार अमित शाहा यांची सभा : भाजपतर्फे जय्यत तयारी !

जिल्ह्यात ‘येथे’ होणार अमित शाहा यांची सभा : भाजपतर्फे जय्यत तयारी !

0
67

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात येत असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाहा यांची सभा फैजपूर येथे होणार असून रात्री उशीरापर्यंत या संदर्भात नियोजन सुरू होते. सूत्रांच्या माहितीनुसार अमित शाहा यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांच्यासह भाजप तसेच महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीत अमित शाहा यांनी जळगाव येथे स्मिताताई वाघ यांच्यासाठी सभा घेतली होती. यानंतर ते आता रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. तर, अमित शाहा यांच्या सभेबाबत आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.


Protected Content

Play sound