Home राष्ट्रीय अमित शहा पुन्हा रूग्णालयात दाखल

अमित शहा पुन्हा रूग्णालयात दाखल

0
31

नवी दिल्ली । अलीकडेच कोरोनावर मात करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अलीकडेच डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर काल रात्री त्यांना श्‍वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

अमित शाह यांना २ ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. तर उपचारानंतर १४ ऑगस्टला अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनावरील उपचार करण्यात आले होते.


Protected Content

Play sound