“आमदार चषक” ओपन कॅरम स्पर्धा; मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार वितरण

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा शहरातील बसस्थानकाच्या मागील मैदानात आमदार चषक ऑल इंडिया ओपन कॅरम स्पर्धाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्याना पुरस्कार वितरण करण्यासाठी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रतिनिधी तुषार पाटील व फैजपूर माजी उपनगराध्यक्ष कुर्बान शेख आणि पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विशाल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन जोजोभाई आणि शौकतभाई केळी व्यापारी विशाल भाई तायडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रोख रकमेसह आमदार चषक असे होते भारतातील विविध राज्यातील कॅरम खेडाळूनि या स्पर्धेत सहभाग नोंदवला. जवळ 8 राज्यातील खेळाडू यांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला उंच शिखरावर नेले. त्यात महाराष्ट्र, गोवा, हैद्राबाद, तेलंगाणा, तामीळनाडू, गुजरात, दिल्ली, हरियाणा आणि राज्यभरातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त खेळाडू यांनी सहभाग घेतला होता. यात विशेष खेळाडू म्हणून मा संजय मांडे (शिव छत्रपती पुरस्कार विजेते) यांनी विजयी पताका फडकवली. त्याच बरोबर निसार अहमद धुळे महाराष्ट्र चॅम्पियन यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले, तसेच तिसऱ्या क्रमांकावर नागपूर ची शान गुरुचरण तांबे यांनी बाजी मारली.

याप्रसंगी स्पर्धा यशस्वीतेसाठी सैयद मोसीन, सावदा शहरातील सोहेल सर, फिरोज लेपटी, शाहरुख शेख, शैबाद भांजा, मोईन खान, चांदणी चौक, मित्रमंडळ, शेखपुरा मित्र मंडळ, ख्वाजानगर दोस्ती ग्रुप, बडा आखाडा मित्र मंडळ तसेच सेतू सुविधा केंद्र सावदा, तसेच सावदा पोलीस स्टेशन सावदा या सर्वांचे आयोजक टीम कडून जाहीर व्यक्त करण्यात आले.

Protected Content