दादावाडी येथे रूग्णवाहिकेला लागलेल्या आगीची जिल्हा प्रशासनाकडून दखल; जिल्हाधिकारी यांचे चौकशीचे आदेश

( Image Credit Source : Live Trends News )

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दादा वाडी येथील उड्डाणपुलावर धरणगावकडून जळगावकडे येणाऱ्या रूग्णवाहिकेला अचानक आग लागल्याने ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत कोणालाही इजा अथवा दुखापत झालेली नाही. या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरूवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता घटनेची चौकशीचे आदेश काढले आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

दरम्यान ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन आणि परिवहन विभागाचे पथक ही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या पथकाकडून ही आग विझविण्यात आली. ही रुग्णवाहिका फोर्स या कंपनीकडून बनविलेली आहे. फोर्स मोटरचे टीमपण जळगावसाठी रवाना झालेली आहे. तसेच ते देखील या तपासमध्ये परिवहन आणि पोलीस विभागाला मदत करणार आहे. ही टिम जळगाव येथे चौकशीसाठी जळगावा दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

या रुग्णवाहिके ऐवजी इतर जिल्ह्यातून दुसरी रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली आहे. ज्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिकेचे प्रमाण पुरेसे राहील आणि जळगाव जिल्ह्यात रुग्णवाहिकेची कमतरता भासणार नाही. त्यानुसार पर्यायी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहे. संपूर्ण घटनेवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, लक्ष ठेऊन आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे.