दीपनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संभाजीनगर येथे दिनांक १३ नोव्हेंबर रोजी आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम संघटनेच्या केंद्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती संभाजीनगर येथे बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत केंद्रीय महासचिव प्रकाश जी सरदार साहेब यांनी संघटनेची समाजाविषयी जबाबदारी व पत्रकारिता,सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील घटकांमध्ये संघटनेचे कशा पद्धतीचे योगदान राहील याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच संघटनेच्या माध्यमातून पत्रकाराची व त्याच्या परिवाराची संघटना काय जबाबदारी पार पडेल व त्यांनी संघटनेसाठी कशा पद्धतीचे योगदान द्यायचे याबद्दल माहिती दिली. तसेच आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून ज्या केंद्राच्या आणि राज्याच्या शासकीय निमशासकीय स्तरावरील विविध योजनांचा यथोचित लाभ घेण्याच्या दृष्टीकोनातून आपण उपाययोजना केल्या आहेत, आणि आपल्या अडगळीत पडलेल्या पत्रकाराला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न त्याकरिता पत्रकारांची कार्यशाळा लाऊन त्यांना प्रशिक्षित करणे.
त्यानंतर संघटनेचे राज्य सचिव देवचंद्र समदूर यांनी सुद्धा संघटनेबद्दल माहिती देऊन येणाऱ्या 31 जानेवारी ,”मुकनायक दिनाच्या” नियोजना संदर्भात माहिती दिली. सदर बैठकीला केंद्रीय महासचिव प्रकाशजी सरदार,केंद्रीय,महाराष्ट्र राज्य सचिव देवचंद्र समदूर,यांच्या उपस्थितीत दैनिक वृत्तरत्न सम्राटचे औरंगाबाद प्रतिनिधी adv. नामदेव सावते (सावंत)यांनी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली . यावेळी देवानंद सावते, सूर्यकांत पठारे,गौतम मोरे, नरेंद्र त्रिभुवन, अमोल धुळे, शांतवान धुळे, मधुसूदन शिखरे आदी दिसत आहेत. जिल्ह्यातील इतर पत्रकारांची उपस्थिती होती.