अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील युवकांनी स्व कष्टाने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेची व बुद्धिमत्तेची पताका फडकविली असून खान्देशवासियांची मान उंचावली आहे. अशा कर्तृत्ववान रत्नांचा सन्मान व्हावा उद्देशाने उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंचने कर्तृत्वाचा महासन्मान करण्याचे योजिले आहे. रविवारी, २८ जुलै रोजी बन्सिलाल पॅलेसमध्ये सकाळी ९.३० वाजता होणाºया या सन्मान सोहळ्यात मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांना व नोबेल फाउंडेशनचे संचालक डॉ. जयदीप पाटील यांना डॉक्टरेट मिळाल्यामुळे त्यांचा विशेष सन्मान होणार आहे. शिवाय यात विविध स्पर्धा परीक्षेतून यश संपादीत केलेल्या युवक, युवतींचा सन्मान व सामाजिक कायार्तून आपला ठसा उमटवणाऱ्या दोन विशेष व्यक्तींचा सन्मान होणार आहे.
या कार्यक्रमात माजी आयकर आयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण, सारथी, पुण्याचे उपव्यवस्थापक अनिल पवार, डीवायएसपी सुनिल नंदवाडकर तसेच बालरोगतज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या सन्मान सोहळ्याचे आयोजन उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळ, अमळनेर तालुक्यातील सर्व विकास मंच, अंबरीष ऋषी महाराज टेकडी ग्रुप, साने गुरूजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, शिवशाही फाऊंडेशन, प्रताप तत्त्वज्ञान केंद्र, स्वामी विवेवकानंद इंटरनॅशनल स्कूल, सी.सी.एम.सी.प्रताप कॉलेज, अमळनेर माजी प्रतापियन्स प्रबोधिनी, अमळनेर पीटीए (कोचिंग क्लासेस संघटना) यांनी केले आहे.