प्रा.किशोर पाटील यांना पीएच.डी. प्रदान

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील धनदाई महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. किशोरपाटील यांना मालवांचल विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रदान करण्यात आले.

The Evolution of Indian History and Religion Through the Years  या विषयावर मालवांचल विद्यापीठातून डॉ. नानाजी भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी पूर्ण केली. याबद्दल धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी. पाटील, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन रावसाहेब के.डी. पाटील, संस्थेचे सचिव राधेश्याम पाटील, संचालक शैलेंद्र पाटील, ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंत मन्साराम पाटील, धनदाई महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, प्राचार्य डॉ.वसंत देसले, प्राचार्य डॉ. वाय.व्ही.पाटील, प्राचार्य डॉ.ए.टी पाटील, डॉ. लीलाधर पाटील यांनी अभिनंदन केले.

Protected Content