अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जनतेने भरपूर प्रेम दिले व आपल्या सेवेची संधी दिली. तालुक्यातील अपुर्ण कामे व विकास कामे करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी केले. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार शिरीष चौधरी यांचा मारवाड, गोवर्धन, बोरगाव, लोंढवे, पाडळसरे, निम, तांदळी, शहापूर, धार, मालपुर, निसरडी, वाकडे, खडके, अंचलवाडी, प्रणव आधी गावांमध्ये प्रचार दौरा झाला. माजी आमदार डॉ.पाटील भाजपचे तालुकाप्रमुख बाळासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार, मारवाड सरपंच उमेश साळुंखे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने देश व राज्यातून विकासाची गंगा वाहत आहे. अमळनेर मतदारसंघातही गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाले असून काही कामे प्रगतिपथावर आहेत. आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यावर विश्वास ठेवून जनताही त्यांच्यासोबत आहे. मात्र काहीचं लोकवर्गणी गोळा करून निवडणूक लढविण्याचा दिशाभूल करीत आहे. जनतेने अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड.आर.आर.पाटील यांनी केले.
ॲड. पाटील म्हणाले की, आमदार शिरीष चौधरी यांनी मतदारसंघात भरीव कामे केली आहेत. मारवाड, गोवर्धन, बोरगाव, लोंढवे, पाडळसरे, निम, तांदळी, शहापूर, धार, मालपुर, निसरडी, वाकडे, खडके, अंचलवाडी, प्रणव आधी गावांमध्ये प्रचार दौरा झाला. यावेळी उदय पाटील, जाकीर शेख, सुरेखा पाटील, सुभाष चौधरी, विक्रांत पाटील, भाजपचे उपाध्यक्ष समाधान धनगर, सुंदरपट्टी सरपंच सुरेश पाटील, उपसरपंच किशोर पाटील, गोरख पाटील, जिजाबराव पाटील, दादा पवार, गोपाळ पाटील, संजीव पाटील, रमेश पाटील, प्रशांत पाटील, संदीप पाटील, दिलीप साळुंखे, विनोद चौधरी, बापू चौधरी, चंद्रशेखर साळुंखे, गणेश पाटील, परिमल आसाम, चौधरी नंदकिशोर चौधरी, मिलिंद पाटील, रवी पाटील, उमाकान्त चौधरी, प्रफुल्ल साळुंखे, गोवर्धनचे उपसरपंच प्रवीण पाटील, उत्तम भिल, नाना भिल, पुंजू भिल, विनोद शिंदे, राकेश पाटील, विकास शिंदे, शशिकांत शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.