Home Cities अमळनेर पिस्तूल घेऊन पळणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले

पिस्तूल घेऊन पळणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले

0
141


अमळनेर प्रतिनिधी | चोपड्यातून गावठी पिस्तुल घेऊन पळणाऱ्या धुळे तालुक्यातील दोघांना अमळनेर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.

धुळे जिल्ह्यातील रहिवासी असणारे दोन जण हे गावठी कट्टा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी सापळा रचला. त्यात दोन जण दुचाकीवरून गावठी कट्टा घेऊन पळून जाताना दिसले. यानंतर पोलिसांनी चोपडा रेल्वे गेटपासून आरोपींचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, आरोपी शहरातील दगडी दरवाजात पोलिसांची व्हॅन अडकली. मात्र पोलिसांनी पाठलाग सुरु ठेवला. यात राजेश गणेश गुरखा (रा.शिरूड, ता.धुळे) आणि मलदरसिंग गुरुमुख सिंग शिकलकर (रा.साक्री रोड, धुळे) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून कट्टा जप्त करण्यात आला.

हि कारवाई सहायक पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश सदगीर, हवालदार संजय पाटील, सुनील हटकर, दीपक माळी, डॉ.शरद पाटील, रवी पाटील, हितेश चिंचोरे, प्रमोद पाटील, कैलास शिंदे, भूषण बाविस्कर यांनी केली.


Protected Content

Play sound