अमळनेर अमोल पाटील । सत्ता असो वा नसो, शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असणार्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आपण आलो असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते येथील राष्ट्रवादी संवाद कार्यक्रमात बोलत होते.
येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री एकनाथराव खडसे, सक्षणा सलगर, गुलाबराव देवकर, जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी काँग्रेस प्रदेश युवक अध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, माजी आमदार साहेबराव पाटील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गफ्फार मलिक, माजी आमदार मनीष जैन, ग्रंथालय सेलच्या रिता बाविस्कर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, कल्पिता पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन विनोद कदम आणि वसुंधरा लांडगे यांनी केले. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही प्रारंभी मार्गदर्शन केले. आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी मनोगत व्यक्त केले.
अमळनेरला प्रचाराच्या वेळी आम्ही सगळे आलो होतो प्रचंड मोठी गर्दी होती. आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये या भागातले मतदार देखील उपस्थित होते त्यावेळी मला आठवतंय की मी अनिल भाईदास पाटील यांच्यासाठी मागणी केली की मी उभा राहिलो पण मला मदत झाली पाहिजे. त्यावेळी मी आश्वासन दिले आम्हाला तुम्ही आमदार द्या आम्ही तुम्हाला धरण देऊ योगायोग पहा नंतर शरद पवार साहेब यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आले आणि त्यानंतर मी जलसंपदा मंत्री झालो हा सगळाच योगायोग बघितला तर तेव्हाचे भाष्य केलेलं होतं. ते आज मी पूर्ण करतोय या धरणासाठी या धरणाची मुख्य भिंत बांधण्यासाठी आयआयटी कडे अंतिम टप्प्यातील डिझाइनिंग एक महिन्यात आपल्याला प्राप्त होणार आहे. आमचे इंजिनियर या पूर्वीपासूनच त्यात बरीच सुधारणा करत आहेत. कोरोनाने मागचं पुढचं वर्ष जसं होतं तसं तर धरणाच्या उंची वाढवण्याच्या आणि बाकीच्या बाबींबद्दल डिझाईन करून घेणं आवश्यक होतं त्याप्रमाणे केल्यास त्याचा सगळा अहवाल प्राप्त होऊन त्यानंतर आता अंतिम चरणात ते डिझाईन गेले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर काम सुरू होईल म्हणून परत बोलतो एकदा सुरू झालेले काम बंद पडणार नाही याची काळजी करू नका हे धरण अडीच वर्षात 2024 मध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पत्रकारांना मी सांगेन तुमचा त्या धरणाचे भूमिपूजन हे खडसे साहेबांनी आणि गोपीनाथ मुंडे यांनी केले पुन्हा सांगतो की त्या धरणाचे उद्घाटन हे खडसे साहेबांच्या हाताने उपस्थितीत करायची व्यवस्था करेल. गेली पाच वर्ष भारतीय जनता पक्षाने पाडळसरे धरणाला एक रुपया दिला नाही पाच वर्षात काही काम झालं नाही आणि त्यामुळे फक्त त्या धरणाच्या झालेल्या बांधकामचे मागच्या आघाडीच्या काळात झालं म्हणजे 1997 ते 1998 भूमिपूजन झालं आणि 2014 सालापर्यंत जे काम झालं त्या 2014 पासून 2019 पर्यंत काम झालं नाही.
नाथाभाऊंवर राग
गेल्या पाच वर्षात एक रुपया दिला नाही भाजपच्या जलसंपदा मंत्र्यांचा राग कदाचित नाथाभाऊ यांच्यावर असावा नाथा भाऊंनी भूमिपूजन केलेले असल्यामुळे त्या धरणावर असल्याने त्यांचा भाजपचा राग होता.
5 तालुक्यांना फायदा
या धरणात पाच तालुक्याना फायदा होणार आहे. त्यातून तीन तालुक्यांना तर प्रचंड मोठा फायदा होणार आहे आपला जसा मतदार संघ कसा चोपडा मतदार संघ आणि नंतर आमच्या देवकारांचा धरणगाव यांना होणार आहे. जाणारे पारोळा शिंदखेडा थोडा थोडा फायदा आहे पण हे तीन मतदारसंघ आहेत आणि त्यामुळे शेतकरी व्यापारी यांना फायदा होणार आहे आज मला बरं वाटलं या प्रमाणात लोकांना फायदा होणार हे लक्षात होता पण प्रत्यक्ष धरण बघण्याचा योग आला.
सर्वांना माझ्याआधी आमच्या प्रदेश या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे. आम्ही का आलेलो आहोत हेही समजावून सांगितले आहे.
मध्यावधी निवडणूक नाही
हा दौरा पाहून मध्यावधी निवडणूक करायच्या काय असे बाकी लोकांना वाटत आहे. पण तसं काहीही होणार नाही आम्ही पाच वर्षे पूर्ण करणार आहोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हेच मुख्यमंत्री राहतील.
पण ज्या ज्या ठिकाणी जागा लढवतो तिथले कार्यकर्ते आणि महाराष्ट्राचा प्रदेश ही माझी जबाबदारी होती हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्या त्या भागातल्या राष्ट्रवादी म्हणून जो काम केले. तर त्याला भेटले पाहिजे संघटनेची चौकशी केली पाहिजे आज सत्ता आहे तर आम्ही सत्तेत लागू आमचा सहभाग आहे त्यात आमच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा काय आमच्या त्या दोन पक्षांच्या आमचा तिसरा पक्ष आहे त्या बाजार समन्वयाच्या संबंधात आणखी काही करणे गरजेचे आहे का या सगळ्याचा आढावा घेत 28 जानेवारीपासून सुरू केलेल्या हा पहिला टप्पा आहे परवा दुपारी बारा एक वाजता जळगावला याचा समारोप होणार आहे 17 दिवसाची आमची ही यात्रा जात असताना मला सांगितले पाहिजे महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंतच्या धुळे नंदुरबार आणि जळगाव धरून आणि 66 विदर्भाच्या जागा भरल्या तर फार मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी जात असताना एक लक्षात आलं या सगळ्या प्रदेशांमध्ये असा मतदार संघ आणि असा तालुका नये ज्या ठिकाणी शरद पवार यांना मानणारा वर्ग वेगळ्या ठिकाणी काम करणारे कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता अनुभवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विशेष अपेक्षा आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही पाडळसरे धरणावर गेलो होतो. कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, शिवाजीराव पाटील, रणजित पाटील, शहराध्यक्ष बाळू पाटील, राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस कविता पवार, तालुकाध्यक्षा योजना पाटील, शहराध्यक्षा आशा चावरीया, आशा शिंदे, भावना देसले, भारती शिंदे, अलका गोसावी, अनिता भालेराव आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे.
अजूनपर्यंत माझा छळ सुरूच
गेली चाळीस वर्षे एकनिष्ठ राहून काम केले त्याच पक्षाने माझा छळ करण्याचे उद्योग केले आहेत गेली पाच वर्षे सहन केले अजूनही भाजप मला त्रास देण्याचा प्रयत्न करीतच आहे असे मार्मिक व्यथा एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली.
माजी आमदारांच्या गळ्यात पुन्हा राष्ट्रवादीची पट्टी
माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या गळ्यात पट्टी टाकून जयवंतराव पाटील यांनी सोबत फोटो घेतला तर मी अजूनही राष्ट्रवादी पक्षातच असल्याचे साहेबराव पाटलांनी सांगून धमाल उडवून दिली. मला अद्याप राष्ट्रवादीतुन बाहेर काढलेले नाही हे विधान केले. यामुळे कार्यकर्त्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. प्रारंभी बाम्हणे फाटा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे स्वागत बाम्हणे ग्रामस्थ व मान्यवरांनी करून अमळनेर मतदारसंघात प्रवेश केला.
यांनी घेतला पक्ष प्रवेश – माजी जिल्हा परिषद सदस्य ए. टी. पाटील, माजी पंचायत समिती सभापती दीपक पाटील, बाजार समिती उपसभापती श्रावण ब्रमहें. मंगरूळ लोकनियुक्त सरपंच हर्षदा पाटील, प्रा संदीप पाटील, लोण चारम येथील अनिता पाटील, सरिता निंबा पाटील, पाडळसरे येथील शत्रुघ्न पाटील, नगाव च्या लोकनियुक्त सरपंच उज्वला महेश पाटील आदींनी प्रवेश घेतला.