अमळनेर (प्रतिनिधी) येथील पी.एन.मुंदडा विद्यालयात 27 फेब्रुवारी हा मराठी दिवस आणि 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिवस या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून विद्यालयात सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक गोकुळ बोरसे होते. पी.एस.विंचूरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून के.बी.पाटील होते.
कार्यक्रमाच्या सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किर्ती सोनार यांनी सादर केले. त्यानंतर इ. 5 ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मराठी दिनाच्या निमित्ताने विविध नाटके, वाकप्रचार, म्हणी आणि गीते सादर केली. तसेच विज्ञान दिवसाचे महत्व जाणून अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञानाची प्रगती आणि माहिती सविस्तरपणे आपल्या मनोगतून सांगितली. कार्यक्रमाच्या या प्रसंगी मराठी विषय शिक्षिका वंदना पाटील यांनी आपल्या मनोगतून मराठी भाषा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य याचे उदाहरणासह स्पष्टीकरण दिले. विद्यालयातील प्रदिप चौधरी, प्रमुख पाहुणे लाभलेले के.बी.पाटील यांनी ही आपल्या विनोदी शैलीतून विद्यार्थ्यांना या दोन्ही दिवसांचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बोरसे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सविस्तरपणे या दिवसांची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.