चोरीच्या सहा दुचाकी जप्त

पहूर ता जामनेर , (वार्ताहर) येथून जवळच असलेल्या पिंपळगाव बु ता जामनेर येथील अठरा
वर्षीय युवकाच्या ताब्यातून तीन लाख दहा हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या सहा दुचाकी पहूर पोलिसांनी हस्तगत करून संबंधित युवकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने पहूर सह परीसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पहूर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून वाकोद येथील रहिवासी शे.शोहेब शे.तस्लीम यांची एम एच २०बी वाय ६८२७ क्रमांकाची दुचाकी मोटरसायकल दि१२फेब्रुवारी रोजी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पहूर पोलीसात अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पहूर पोलिस चोरट्यांचा घेत होते. पिंपळगाव बु येथील रहिवासी पारदर्शी उल्हास पाटील वय (१८) या युवकाविषयी पोलीसांना गुप्त माहिती मिळाली. व त्याच्या हालचाली पोलिसांना संशयित वाटल्या.सदर युवक वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी चा वापर करीत होता. त्यानुसार पो.काँ.प्रविण देशमुख, शशिकांत पाटील, साहाय्यक फोजदार अनिल अहिरे, किरण शिंपी, अरूण वाणी, ज्ञानेश्वर बाविस्कर,रवींद्र भोई,श्रीराम कुमावत,पोलिस मित्र पिंटू कुमावत या पथकाने गुरुवारी पारदर्शी पाटीलला शिताफीने ताब्यात घेतले. व त्याने कमानी धरणाजवळ चोरीच्या लपवून ठेवलेल्या सहा दुचाकींची पोलीसांना कबुली दिली आहे. यातील पाच दुचाकी विना नंबर असून वाकोद येथील दुचाकी वर फक्त नंबर आहे. या दुचाकी घटनास्थळारून पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत. साधारण तीन लाख दहा हजार रूपये किंमतीच्या दुचाकी असून चार दुचाकी बर्हाणपूर येथील आहेत. तर एक दुचाकी भुसावळ व एक वाकोद येथून चोरून आणल्याची माहिती पोलिसांना या युवकाने दिली आहे.आरोपीस पहूर पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेने पहूर सह परीसरात खळबळ उडवून दिली आहे.

Add Comment

Protected Content