अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एका अल्पवयीन मुलीवर शारिरीक अत्याचार करून तिला धमकावल्याप्रकरणी दोघा तरूणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवून तिच्यावर अत्याचार करून तिला धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. याबाबत दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, शहरातील एका साडेसतरा वर्षीय मुलीचा विवाह ठरला आहे. ती अठरा वर्षाची असताना तिचा विवाह करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या दरम्यान, संबंधीत तरूणीने गांधीलपुरा भागातल्या मेहतर कॉलनीतील कुणाल उर्फ आण्णा देवा घोगले याने धमकी देवून अत्याचार केल्याची माहिती आपल्या कुटुंबाला दिली. त्याला रवी उर्फ रघूभाई घोगले मदत करायचा. तर तसेच नेहमी धमकी द्यायचा असेही तिने सांगितले. . याबाबत पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, रवी घोगले याने आपण तुझ्या घरातील लोकांना मारून टाकेल, अशी धमकी दिली, अशीही तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. या अनुषंगाने . याबाबत पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कुणाल उर्फ आण्णा देवा घोगले आणि रवी उर्फ रघूभाई घोगले या दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.